Friday, October 9, 2009

'सिंहासन सापडलं' भाग ३

आपल्या राजधानीत चाललेला खटला या पोरासोरापर्यंत आलेला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. पण तो मुलगा काय सांगतो याची उत्सुकता असल्याने तो स्तब्ध सबून पुढें ऎंकु लागला. तो मुलगा असे म्हणाला की, 'एवढी सोपी गोष्ट राजाच्या लक्षांत येऊं नये याचं आश्चर्य वाटतं ! अरे, धाकट्या भावाचा घोडा मोठ्या भावाला द्यावा मोठ्या भावाचा घोडा धाकट्याला ! आणि मग शर्यंत लावावी. अर्थात जो पुढे जाईल तो जिंकेल.'

'अहो, पण-मृत्युपत्रांत ---' तो मुलगा मध्येंच म्हणाला.

'मला ते ठाऊक आहे. मृत्युपत्रांप्रमाणे वाटणी होणार हें निश्चित ! जो पुढें आला असेल-त्याच्या घोड्यावर बसलेला भाऊ (म्हणजे त्याचा घोडा) मागें रहाणार नाहीं का ?'

हा निर्णय ऎकून राजा एकदम खूष झाला. त्यानें पुढें होऊन त्या मुलाला अणखी कांही गहन प्रश्न विचारले. त्याचीही त्यानें अगदीं योग्य, स्पष्ट उत्तरें दिलीं. हा मुलगा कुणी तरी मागेपुढे विद्वान होणार आहे अशी त्याची खात्री झाली.

0 comments: