पण काय झाली मजा ! त्या झाडाखालून दूर होतांच तो मुलगा आपल्या इतर मित्रांसारखाच बोलूं लागला. हंसू लागला. साध्या प्रश्नानाही त्याला उत्तरें देतां येईनात. मग राजाने दुसऱ्या मुलाला त्या छायेखाली बसवले. आतां तो मुलगा उत्तम उत्तरे देऊ लागला.
ते बालगोपाळ म्हणाले, आम्ही रोज हाच खेळ खेळतो. राजाच्या लक्षांत आले कीं, या जागेचाच कांहितरी गुण दिसतो. आपण तेथें बसून पाहू या ! असा विचार करून तो त्या जागेवर जाण्यासाठीं चालू लागला, पण त्या जागेजवळ येतांच त्याच्या पायाला चटके बसूं लागले. तो घाबरून मागे सरकला. पण आतां त्याचें मन स्वस्थ बसेना. ती जागा कुणाच्या मालकीची आहे याचा त्यानें तपास काढला व त्या जागेची जी किंमत त्यानें सांगितली -- त्याच्या पाचपट पैसे देऊन त्यानें ती जागा खरेदी केली.
नंतर त्या छायेखाली मजुरांना बोलावून खणायचा हुकूम सोडला. खोल खणल्यावर आंतून रत्न्जडित चंद्रकांत मण्यांचें सुंदर सिंहासन निघाले. सिंहासन अतिशय सुंदर होते. सिंहासनाभोवती बत्तीस पऱ्या आपले सोन्याचे पंख पसरवून आनंदाने हसत होत्या. रत्नें चमचम करीत होती.
राजानें सिंहासन उचलले व धारानगरीला एका खास महालांत ठेवले, त्या सिंहासनाकडे बघत राहण्याचा राजाला छंदच लागला.

0 comments:
Post a Comment