'होय ! मीच. माझें नांव जया ! मीच बोलते आहे. राजा, अरे आपल्याच तोंडानें तूं दान दिल्याचा उल्लेख केलास ! दान उजव्या हातानें करावें पण ते डाव्या हातालाही कळूं नये अशा गुप्ततेनें करावें असा नियम आहे आणि तूं तर आत्मस्तुति केलीस; त्यामुळें तुझें दान, सर्व पुण्य फुकट गेले. तुला माहीत नाहीं का ?'
'क्षमा करावी देवी ! मी अज्ञानी आहे.'
'अरे, एखाद्या माणसाच्या सामान्य गुणाचे जर दुसऱ्यांनी प्रशंसा केली तर तो थोर समजला जातो आणि प्रत्यक्ष इंद्र - स्वर्गाचा राजा इंद्र - जर आत्मस्तुति करूण लागला तर तो सामान्य समजला जातो--'
परै: प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत ।
इंद्रोऽपि लघुता याति स्वयं प्रख्यपितैगुणै: ॥
'देवी, मी चुकत होतो. मला आपण सन्मार्ग दाखवलांत ! आता आपले आभार मानायच्या अगोदर एक शंका विचारायची परवानगी द्यावी' --
'विचार ! राजा, खुशाल विचार.' ती जया पुतळी म्हणाली.
हें सुंदर सिंहासन कोणाचें आहे ? यावर बसणारा राजा असामान्य असणार हे नक्कीच. त्याच्या औदार्याची गोष्ट मला आपण सांगावी अशी इच्छा आहे --'

0 comments:
Post a Comment