Friday, October 9, 2009

'रुपेरी बाण' - भाग १

सुरंगपुरात आज बरीच धामाधुम होती. महाराजांनी तिरंदाजीचा सामना ठेवला होता. असा सामना वर्षातून एकदा दिवाळी नंतर होत असे. जो पहिला येई तो बहुमोल बक्षीस घेऊन जाई. या वेळचे बक्षीस एक सुंदर रुपेरी बाण होता. दर वेळी तोच बक्षीस घेऊन जाई. पण यंदा सुंदरपुरातील नागरिकांचे नजरेसमोर शेखर डाकूची छबी तरळत होती.


शेखरचे मूळचे नाव शंकर. गत वर्षी झालेला समना शंकरने बघितला होता. तो खेळलाही होता. पण पदरी अपयश आले होते. कपटी धूरंधराने पराभव केला होता भाग घेणारांचा. या पराभवांने शंकरच्या मनात आग भडकविली. बारा महिने झ्टला तो अन तिरंदाजीचे भरपुर शिक्षण घेतले. याच काळात तो धनिकांना लुटून गरीबांचे पोट भरू लागला. शंकरचा शेखर झाला. राजाने खूप प्रयत्न केले. पण शेखरला कोणीही पकडू शकले नाही. शेखर तिरंदाजीचा सामना चुकविणार नाही. तो तेथे येईलच अशी कुणकुण राजाच्या कानावर गेली होती. तो अति आतुरतेने या दिनाची वाट पहात होता.

0 comments: