एकदा काही भक्तांनी रामचंन्द्रच्या भाषणाचा कार्यक्रम ठेवला. अंगणात नारळाच्या झावळ्यांखाली मंच तयार करण्यांत आला.
रामचन्द्र उठुन गळा साफ करत बोलू लागला, "आज गोकुळाष्ठमी. श्रीकृष्णाचा जन्मदिवस. कृष्णाचा अर्थ आहे काळा. काळेपणा हा अंधाराचं प्रतीक आहे. अज्ञान नावाचा अंधार दूर करणारा परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण. त्या परमात्म्याचा जन्म कुठे झाला ? तुरुंगात, आता खोलात शिरलं तर आपाल्याला कळेल की, प्रत्येक मानवाचं शरीर हे तुरुंगासारखंच असतं. या देहच्य आत असतो आत्मा. हा आत्मा म्हणजेच परमात्मा, श्रीकृष्ण. हा सण, ही कृष्णाष्टमी मानवाला आत्मबोधाचं ज्ञान देते." रामचन्द्राला वाटले की भाषण ऐकूण लोक आता टाळया वाजवतील.
पण त्यांच्यातले काहीजण उठून त्याच्याकडे सहानुभुतीने पाहू लागले, तर काहीजण आपले हसू दाबायचा प्रयत्न करू लागले.
हे पाहून रामचंन्द्राने आश्चर्याने बुडून मंचावर बसलेल्या पंडित शिंवशर्माला विचारले, "पंडितजी, माझ्या भाषणात काही चूक झाली का ? काही असंबद्ध गोष्ट माझ्या तोंडून बाहेर पडल्या का ?"
"महाशय, आपण उत्तम वक्ता आहात. आपल्या भाषणात चुका असायचा प्रश्नच उदभवत नाही. पण होय, एक असंबद्ध आपल्या तोंडून बाहेर पडली, ती अगदी स्पष्ट आहे. खरी गोष्ट अशी आहे की, आज कृष्णाष्टमी नव्हे, तर रामनवमी आहे." शिंवशर्मा म्हणाले.